स्टोरी

तडीपार व्यक्तीला सहज तिकीट दिल जात हे दुर्दैवच..! रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शहरामध्ये दहशत निर्माण करणारा हप्ते न दिल्यास गोरगरीब व्यापाऱ्यांच्या डोक्यावर बंदूक रोखणारा तसेच वाईट परिस्थितीशी झुंजणाऱ्या महिलांचा छळ करणारा, लोकांची आर्थिक फसवणूक त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा या विविध तक्रारीमुळे त्याला एका वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार केलं होतं आणि सहा महिने होण्या अगोदरच इलेक्शनच्या तोंडावर त्याला स्टे मिळतो आणि त्याला शहरातील एका मोठ्या नेत्याकडून सहज तिकीटही जाहीर होते या अगोदर १० वर्ष नगरसेवक असताना एकही दिवस एकाही वार्ड मध्ये फिरकला देखील  नसून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्याची गुंडगिरी पुन्हा वाढवण्यासाठी खतपाणी घातलं जातं याचा सरळ सरळ अर्थ होतो की येथील जनतेच्या भावनांना त्यांच्या इज्जतीला काहीच किंमत नाही.ज्यांनी कित्येक वर्ष पदाचा गैरवापर करून गोरगरिबांचा छळ केला तर चार वर्षा पूर्वी माझा सहित अनेक गोरगरीब व्यावसायिकांचे व्यवसाय याच माजी नगरसेवकाने माजी माझी नगराध्यक्षाला हातिशी धरून केवळ हप्त्यासाठी गोरगरिबांचे व्यवसाय उध्वस्त केले. गोरगरीब व्यापाऱ्यांना धाक दाखवून हप्ते वसूल करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या तडीपर व भ्रष्ट व्यक्तींना मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातात आणि हे व्यक्ती छातीठोकपणे सांगतात की मी भरघोस मताने निवडून येणार एवढा विश्वास आणि कॉन्फिडन्स यांच्यामध्ये येतो तरी कुठून हा माझ्यासारख्या सर्वसामान्याला पडलेला एक गंभीर प्रश्न आहे.

अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून शहरातील वातावरण पुन्हा एकदा भयाभित करण्याचा हा डाव चाललेला आहे पण तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही आता या मध्ये सफल व्हाल तर ते आता शक्य नाही कारण तुम्हाला वाटत असेल की,पैसा असेल तर जनतेला आपल्या तालावर नाचवता येत पण आता या भ्रमात मुळीच राहू नका कारण येथील जनतेला आमच्यासारख्या कष्टकरी गोरगरीब लोकांची काळजी असेल जर या शहरात पुन्हा गोरगरीब व्यापारांकडून हप्ते वसुली, गोरगरीब जनतेचा छळ तसेच नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार या गोष्टी यापुढे व्हायला नको पाहिजे असतील तर उपरलकर- पाटेकरला स्मरून सांगतो येथील जनताच यांना या भूमीतून कायमचेचं तडीपार करतील हा आपल्या सावंतवाडीकरांचा विश्वास आहे कारण येथे अति जास्त काळ टिकत नाही असं म्हटलं जातं.


Spread the love

Related posts

हमास -इस्रायल युद्ध थांबणार?

news

मुणगे येथील गावठी बाजारात ३१ हजार रुपयांची उलाढाल…!

news

कवी श्यामसुंदर गावकर यांच्या ” पुन्हा एक शून्य ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

news

Leave a Comment