स्टोरी

फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचा माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस शिक्षण क्षेत्रातील कामागिरीमुळे माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस एम. ए. बी. एड. असून सध्या सावंतवाडी शहरातील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांचं मुळ गाव मांगेली देऊळवाडी, तालुका दोडामार्ग आहे. शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असतांना दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवून देणे, भरतीपूर्व सैनिकी पोलीस प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करणे आणि शाळा कॉलेजमधील विध्यार्थ्यांना सर्वतोपरी योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षक गोपाळ गवस सातत्याने करत असतात. गोपाळ गवस सन २०१२ पासून राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत.या पदावर कार्यरत असतांना त्यांनी NCC मध्ये अनेक विध्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत जीवनात योग्य दिशा दाखवण्याचे काम केले आहे आणि करत आहेत.

संस्थेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गोपाळ गवस यांचा सत्कार
NCC विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देतांना गोपाळ गवस
NCC च्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना गोपाळ गवस

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये कार्यरत गोपाळ गवस यांच्या अतूट  प्रयत्नांनी आणि योग्य मार्गदर्शनमुळे NCC ची विध्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हिने २०२३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि कळसुलकर इंग्लिश स्कूलचे नाव दिलीपर्यंत पोहचवले. तसेच यावर्षी २०२५ मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश मिळवलं आणि पुन्हा एकदा कळसुलकर इंग्लिश स्कूलचे नाव दिल्लीत गाजले. या विध्यार्थ्यांच्या यशामागे फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस यांचा मोठा वाटा आहे.

स्वरांगी खानोलकर
राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर
विध्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण देतांना गोपाळ गवस
विध्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण देतांना गोपाळ गवस

गोपाळ गवस शाळेत शिक्षक आणि फर्स्ट ऑफिसर (NCC) म्हणून काम करत असतांनाच शाळेतील सर्व विध्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे तसेच विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल असतात. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सर्वांगिण विकासासाठी गोपाळ गवस यांचं पालकांनासुद्धा योग्य ते मार्गदर्शन मिळत असतं. अशा मनमिळाऊ स्वभावामुळे गोपाळ गवस यांचे शाळेतील विध्यार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते आहे. गोपाळ गवस यांच्या या कामाचा योग्य तो आढावा घेऊनच माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दिपकभाई केसरकर यांनी त्यांचा विशेष सत्कार केला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस (एम. ए. बी. एड.)

Spread the love

Related posts

सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!

news

गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई देवीचा , श्री देवी महामाया आई देवीचा स्वयंभू श्री देव मयेकर कुळकार दैवताचा वर्धापनदिन

news

माहूरगड रेणुका देवी संस्थानच्या वतीने महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांचा सन्मान.

news

Leave a Comment