शिक्षण

कणकवली तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक समितीतून प्राथमिक शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश.

Spread the love

कणकवली प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली चा मेळावा दिनांक २२ जून रोजी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन श्री. संदेश सावंत (माजी जि. प. अध्यक्ष)यांच्या हस्ते झाले.
stonebahise.com
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय वेतुरेकर(शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह), श्री.किसन दुखंडे (राज्यसंघटक), मंगेश खांबळकर(जिल्हा सचिव),श्री.संतोष कोचरेकर, श्री.श्रीराम विभूते, श्री. दशरथ शिंगारे, श्री. रामचंद्र डोईफोडे,श्री. रामचंद्र सातवसे, श्री संजय कोळी श्रीम.राधिका जगदाळे, श्रीम.नेहा गवाणकर तसेच सर्व तालुक्याचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप तांबे यांनी केले

आज झालेल्या तालुका मेळाव्यात शिक्षक भारतीच्या कामाने प्रेरीत होऊन तसेच शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कणकवली तालुक्यातील ११० पेक्षा जास्त शिक्षक प्रमुख कार्यकर्त्यांसह शिक्षक भारतीत प्रवेश करत आहेत असे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांनी मनोगत व्यक्त केले. गिल्बर्ट फर्नांडीस यांच्यासोबत आनंद तांबे,विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, महेंद्र पवार, संदीप तांबे, दिलीप धामापूरकर,कल्पना मलये, इंदू डगरे या प्रमुख कार्यकर्त्यांसह ११० शिक्षकांनी शिक्षक समितीतून शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी शिक्षक भारती संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर देऊनत्यांच्या साठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री.संजय वेतुरेकर यांनी नवीन संचमान्यता ही गावागावातील शिक्षण व्यवस्था मोडून काढणारी असून त्याविरोधात शिक्षक भारती राज्यभर आंदोलने करणार असल्याचे सांगितले.तर जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक भारती ही संघटना सभासदांना गृहीत धरून न चालता प्रत्येक शिक्षक सभासद हा केंद्रस्थानी मानून चालणारी संघटना आहे. शिक्षकांचे प्रश्न इतर संघटनांप्रमाणे दुटप्पीपणाने न हाताळता सभासदांच्या मागणीनुसार शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे तडीस लावणारी संघटना असल्याने शिक्षक भारतीकडे शिक्षकांचा ओढा वाढत आहे. तसेच आज ज्या शिक्षकांनी शिक्षक भारतीवर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जावू देणार नाही असे प्रतिपादन केले.तसेच गिल्बर्ट फर्नांडीस यांच्यासोबत आनंद तांबे,विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, महेंद्र पवार, संदीप तांबे यांच्या प्रवेशामुळे शिक्षक भारती संघटना भविष्यात कणकवलीमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रभावशाली होईल असे मत व्यक्त केले. शेवटी संजय कोळी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Spread the love

Related posts

कळसुलकरच्या शिक्षण सप्ताहचा समारोप प्रा. रूपेश पाटील यांच्या व्याख्यानाने रविवारी होणार.

news

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा : “बीट द प्लास्टिक पोल्यूशन” या संकल्पनेवर भर.

news

कसालच्या तन्वी कदमचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश..!

news

Leave a Comment