शिक्षण

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा : “बीट द प्लास्टिक पोल्यूशन” या संकल्पनेवर भर.

Spread the love

कुडाळ (मुळदे) : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे दिनांक ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन “बीट द प्लास्टिक पोल्यूशन” या जागतिक संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर प्रबोधन करत शपथ विधी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश उईके यांनी या दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रम साजरा करण्यामागील भूमिका प्रस्तावनेद्वारे स्पष्ट करून केली. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनात सक्रीय सहभागाचे आवाहन केले. यानंतर महाविद्यालयाचे प्रक्षेत्र अधिकारी डॉ. महेश शेडगे यांनी परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याबाबत उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांनी शाश्वत शेतीसाठी पर्यावरणीय जबाबदारी महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक प्राध्यापक तसेच मा. सहयोगी अधिष्ठात्यांचे तांत्रिक अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी जागतिक तसेच भारतीय स्तरावरील पर्यावरणीय घडामोडी, चालू संशोधन, आणि उपाययोजनांचा सांख्यिकीय माहितीच्या आधारे सखोल आढावा घेत उपस्थित विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. नेहा तेंडोलकर हिने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

बिळवसच्या गौरव पालवचे पखवाज वादन परीक्षेत यश! ‌

news

दहावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल!

news

जेईई-मेन परीक्षेत कणकवलीच्या परेश मडवचे घवघवीत यश..!

news

Leave a Comment