स्टोरी

कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या २००४_०५ च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला संगणक संच भेट.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शाळेशी असणारे ऋणानुबंध जपत सेवाभावी वृत्तीने कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक वर्ष २००४-०५ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या आर्थिक सहयोगातून प्रशालेला संगणक संच भेट दिला. तसेच प्रशालेविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.यामध्ये नुतन म्हाडगूत,वीणा सावंत,सीमा नेवगी, शांती पास्ते, सुप्रिया जाधव, विलास तावडे, अरुण पास्ते,सचिन धोंड, प्रमोद तावडे, प्रदीप तावडे, विनोद पावसकर, स्वप्निल गावडे, सुरेखा पास्ते, नमिता पास्ते, दिपिका सावंत,भारती पास्ते, सुप्रिया शेडगे, शितल परब, अश्विनी लाड,सचिन राऊळ, सुरेंद्र पास्ते, तुळशीदास घोगळे,सोनम सावंत, रघुवीर कविटकर, ज्ञानेश्वर सावंत, शिल्पा सावंत या विद्यार्थ्यांनी सहयोग दिला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, लिपिक रविकमल सावंत आदी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष श्री.शिवाजी सावंत, सचिव श्री.यशवंत राऊळ यांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.

 


Spread the love

Related posts

लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’च्या चर्चा सुरु असतांनाच कुंभमेळ्यातून प्रसिद्धीस आलेली मोनालिसा भोसले आणि फरमान खान अडकले विवाहबंधनात.

प्रसाद परब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

news

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी….! डॉ विश्वास साठे.

news

Leave a Comment