स्टोरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग नगरी येथे पार पाडला कौतुक सन्मान सोहळा.

Spread the love

ओरोस प्रतिनिधी: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कलेला महत्त्व असते कला ही परमेश्वराची लिला आहे ती जशी पसरावी तशी ती पसरली जाते तेव्हा माणूस मोठा होतो कोकण हा कलेचा महासागर आहे त्यातील मोती शिंपले ताऱ्यासारखे चमकणारे आहेत त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचाही या जिल्ह्याला वारसा लाभलेला आहे कुठेतरी त्यांचे या जिल्ह्यात स्मारक व्हावे या उद्देशाने आयोजकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येकामध्ये पैल्लू असतो, त्या पैलूचा सत्कार भरभरून दाद देऊन करण्याचं काम सिंधुदुर्गातील ही समृद्धी पब्लिकेशन ही संस्था गेली अनेक वर्ष करत आहे.या संस्थेचे कार्य महान असून खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी ओरोस येथे बोलताना केले.

समृद्धी पब्लिकेशन, सिंधुदुर्ग आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० व्या जयंतीनिमित् अहिल्या भीम पर्व कला, सामाजिक, साहित्य, संमेलन, सिंधुदुर्गनगरी येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आले होते. यावेळी प्रास्ताविक करताना प्राध्यापक बी एन खरात म्हणाले या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन देशाच्या कानाकोपऱ्यात करण्यात आले होते. यातूनच अनेक हिरे शोधून आम्ही सर्वांनी समाजासमोर आणून त्यांचं कौतुक केलं. आज अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. आजच्या या भीम पर्व कार्यक्रमातून अहिल्याबाईंचे विचार समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यिकांचे पुस्तके प्रकाशित करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दैनिक तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्तीचे डेस्क इनचार्ज आणि उपसंपादक अवधूत पोइपकर, मसुरे गावची कन्या इंटरनॅशनल कराटेपटू वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर यांना राज्यस्तरीय मातृभूमी सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गोव्याचे सुप्रसिद्ध गजलकार अजय नाईक यांच्या बहारदार आवाजाने गझल सादरीकरण संपन्न झाले व तसेच जिल्ह्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यबिरांचा सत्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सिंधुदुर्गातील लोप पावत असलेल्या पारंपारिक कलांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक बी.के.जी चे संचालक डॉ. दत्तात्रय करपे, पुणे येथील दिग्दर्शक, निर्माता, लेखक श्री.संदीप राक्षे, मुरबाड येथील उद्योजक दिनेश उघडे, पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री.एन. जी. खरात, पंचशील ट्रस्टचे, अध्यक्ष – संजय खोटलेकर, गोवा येथील सुप्रसिद्ध गीतकार व गझलकार अजय नाईक, महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री दशरथ शिंगारे, भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. यशवंतराव शेळके, आयपीएस उत्तीर्ण बिरदेव डोणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व आयोजन समृद्धी पब्लिकेशनचे संचालक डॉ. बी. एन.खरात यांनी केले.

या कार्यक्रमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी अहिल्या भीम पर्व सन्मान कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कारेकर यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र कुमार चव्हाण यांनी केले. यावेळी या संमेलनाचे सर्वेसर्वा प्राध्यापक बी एन खरात यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन.

news

शेतकऱ्यांसाठी ‘जल हे विश्व’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

news

सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन तर्फे रानभाज्या पाककला प्रदर्शन व स्पर्धा चे आयोजन!

news

Leave a Comment