स्टोरी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडीत योगा व प्राणायाम मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष विभागाच्यावतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना साधना गुरव बोलत होत्या.

यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. धीरज सावंत, डॉ. चौगुले, डॉ. निलेश अटक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव, एन सी डी विभागाच्या समुपदेशक अदिती कशेळीकर, सिस्टर आल्मेडा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ निलेश अटक यांनी योगाचे महत्त्व आणि दैनंदिन आवश्यकता व मानसिकता याबद्दल माहिती देऊन

यावेळी साधना गुरव यांनीतसेच योगासनाचे महत्त्व पटवून देऊन उपस्थिताना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, ओंकार, सूर्यनमस्कार आदी योगप्रकाराबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले. एन सी डी विभागाच्या समुपदेशक अदिती कशेळीकर यांनी तंबाखू मुक्तीबद्दल प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. निलेश अटक यांनी केले.


Spread the love

Related posts

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता! – इम्रान खान यांचा आरोप….

news

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव मोहिते यांचे पुणे येथे निधन!

news

कोकण किनारपट्टीसह राज्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळाची शक्यता.

news

Leave a Comment