स्टोरी

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातून काय शिकता येईल?

Spread the love

संपादकिय: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी १८ एप्रिल रोजी रात्री ८:३० वा.  च्या सुमारास स्वत:वर गोळी झाडली. या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सोलापुर तसेच देशातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी असं टोकाचे पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली होती.

न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांचे वय ६९ वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.

डॉ. शिरीष वळसंगकर यांचं हॉस्पिटल

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अनेकांचे आधारस्थंभ, अनेकांना जीवनदान देणारे डॉक्टर आणि खूप मोठे व्यवासायिक   असं थोर व्यक्तिमत्व टोकाचे पाऊल का उचलले असेल? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याकडे पैसा असावा, मान प्रतिष्ठा असावी, धन दौलत असावी, प्रॉपर्टी असावी मग आपण सुखी होऊ. मग साहजिकच डॉ. शिरीष वळसंगकर यांनी यांच्याकडे यापैकी सर्व काही होते. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याकडे कशाचीच कमी नव्हती. तरी पण त्याने आत्महत्या करणे यातूनही नक्की सिद्ध होतं की, पैसा, मान प्रतिष्ठा, धन दौलत, प्रॉपर्टी हे सर्व काय भरपूर प्रमाणात असूनही एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते तर नक्कीच पैसा, मान प्रतिष्ठा, धन दौलत, प्रॉपर्टी यापेक्षाही मोठं काही असेल तर ते आत्मिक समाधान होय. या धक्कादायक प्रकरणानंतर नक्कीच असं म्हणता येईल की डॉ. शिरीष वळसंगकर या व्यक्तीकडे सर्व काही होतं पण कुठेतरी त्यांच्याकडे आत्मिक समाधान न होतं. मग त्याला कारण काही असेल. हे मात्र सर्वसामान्य व्यक्तीला मान्य करावंच लागेल. डॉ. शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्या प्रकरण पैसा, मान प्रतिष्ठा, धन दौलत, प्रॉपर्टी याची किंमत कुठेतरी शून्य आहे. हे दाखवणार आहे. हे नाकारता येणार नाही. तसेच डॉ. शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्या प्रकरणामुळे पैसा, मान प्रतिष्ठा, धन दौलत, प्रॉपर्टी हे सर्व काही मिळाल्यानंतर जीवन सुखी होईल असं म्हणता येणार नाही असं सुद्धा सिद्ध होतं.


Spread the love

Related posts

लठ्ठपणा कमी करण्यासाठी १६ ऑगस्ट पासून योग शिबीराचे आयोजन. 

news

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा  उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..! इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

पिंगुळी येथील ट्रक टर्मिनस येथे रिक्षा व कार यांच्यात अपघातात.

news

Leave a Comment