स्टोरी

सावंतवाडी भटवाडी येथील दत्त मंदिर संस्थेच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी भटवाडी येथील दत्त मंदिर संस्थेच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री राऊत म्हणाले या मंदिराच्या विकासासाठी आपण निश्चितपणे हातभार लावू असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्त मंदिर समितीचे उदय आळवणी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, निशांत तोरस्कर, दिलीप भालेकर आधी उपस्थित होते.

 

श्री राऊत यांनी आज दत्त जयंती निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी भटवाडी धवडकी एसटी बस स्थानक आदी दत्त मंदिर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराचा गजरही केला. यावेळी श्री राऊत म्हणाले निश्चितपणे आम्ही जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहोत. जनतेचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य निश्चितपणे आम्ही पूर्ण करणार आहोत जनतेने आम्हाला चांगले सहकार्य केले आहे कोकणच्या विकासासाठी नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नेहमी कटिबद्ध आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न!

news

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त मराठा समाजामार्फत वृक्षारोपण!

news

छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत…! सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

news

Leave a Comment