स्टोरी

घावनळेत ८ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

कुडाळ: घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.

या स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक 5000 रु व चषक, द्वितीय क्रमांक 3000 रु व चषक, तृतीय क्रमांक 2000 रु व चषक तर लहान गटासाठी प्रथम क्रमांक 3000 रु व चषक, द्वितीय क्रमांक 2000 रु व चषक, तृतीय क्रमांक 1000 रु व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी राजकुमार घावनळकर 9421416894 आणि मायकल फर्नांडिस 9923099547 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाने केले आहे.


Spread the love

Related posts

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू.

news

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सावंतवाडी शाखेतर्फे व जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान.

news

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त सिंधुदुर्गात ४५ ठिकाणी गदापूजन!

news

Leave a Comment