स्टोरी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू.

Spread the love

१ जुलै वार्ता: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारासहा अपघात घडला. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली आणि क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.


Spread the love

Related posts

रिफायनरी विरोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा!

news

आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांनी लिहिलेली आणि बेस्टसेलर ठरलेली चार पुस्तकं

news

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन.

news

Leave a Comment