क्राईम

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

Spread the love

बदलापुर: बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदलापुरातील आंदोलन

बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्यानंतर आज आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी आता कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.

 

यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेले कृत्य याबाबत तपास करायचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला १७ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत २४ ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे.


Spread the love

Related posts

परीक्षा परिषदेच्‍या प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे निलंबित!

news

नाशिक येथे ५ लाख रुपयांची लाच घेतांना प्रशासकीय अधिकार्‍याला अटक !

news

पुणे (बुधवार पेठेत) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

news

Leave a Comment