राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांदा प्रकरण चांगलेच तापले! मुख्यमंत्री संतापले

Spread the love

काही दिवसांपासून कांद्याच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उत्पादन घेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था खूपच वाईट आहे. हाच मुद्दा सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरु आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नाफेड कडून कांद्याची खरेदी कुठे सुरू आहे? त्याची केंद्रे कोणती आहेत? अशे प्रश्न विचारात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असतांना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत असतांना विरोधकांवर चांगलेच संतापले होते. विरोधक आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठीमागील सरकारने काहीच मदत केली नाही. म्हणत केलेल्या मदतीवर भाष्य केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असतांना, नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. सगळीकडे नाही तर काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे सांगितले. याच वेळी छगन भुजबळ यांनी दिलासा कधी देणार असा सवाल उपस्थित केला. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते. बोलत असतांना शिंदे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना बारा हजार कोटी रुपये दिले.तुमच्यासारखी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली नाहीत. आणि कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले, तुम्ही जाहीर करून नाही दिले ते आम्ही दिले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला.कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल असे सांगत क्विंटलनुसार न्याय देऊ असे शिंदे यांनी सांगत शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीर पणे उभे राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत विरोधकांना टोला लगावला आहे.दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नाफेड कडून केली जाणारी खरेदी यावरून मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.


Spread the love

Related posts

आप्पासाहेबयांचं फार मोठं योगदान आहे,मी हे कदापि विसरू शकणार नाही! एकनाथ शिंदे…

news

भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच! अजित पवार

news

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत! नितेश राणे

news

Leave a Comment