स्टोरी

धागा धागा अखंड विणूया छत्रपती शिवराय मुखे म्हणूया…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा जोडत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भारतभर विविध रूपामध्ये साकारल्या गेल्या. काहींनी भव्य रांगोळ्या मधून, पेंटिंग मधून, कोलाज चित्रांच्या माध्यमातून तर प्रत्यक्ष शेतामध्ये छत्रपती शिवरायांचे रूप साकारले. परंतु एखाद्या शाळकरी मुलीने विविध रंगीत दोऱ्यांच्या सहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे.

श्रेया समीर चांदरकर हिने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने जवळपास पाच दिवस अथक परिश्रम घेत तिने हे चित्र पूर्ण केले. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे शाळा एक वेळ भरते. घरी लवकर आल्यामुळे तिने या वेळेचा सदुपयोग करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी जवळपास १०० विविध रंगांच्या दोऱ्यांचा वापर तिने केला. यासाठी श्री समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Related posts

१०८ रुग्णवाहिका चालक संपावर युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने स्वीकारली रुग्णांची जबाबदारी.

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! भाऊ तोरसेकर….

news

सावंतवाडी सिंधुदुर्ग बँक सेवानिवृत्त अधिकारी मिथिलनाथ राऊळ यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

Leave a Comment