शिक्षण

कळसुलकर प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह दिमाखात साजरा.

Spread the love

सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग.

         

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सावंतवाडी या प्रशालेत शिक्षण सप्ताह निमित् आजच्या चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.तसेच इयत्ता तिसरीच्या मुलांनी पारंपारिक वेशभूषा, पोवाडे, ओव्या, गाणी, एकांकिका, यांचे सुंदर सादरीकरण केले.

यासाठी इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक श्री. प्रदीप सावंत व श्री अमित कांबळे यांचे मुलांना मार्गदर्शन मिळाले. शिक्षण सप्ताह मधून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव इयत्ता चौथीच्या मुलांनी दशावतारी नाटक यांचे सादरीकरण त्यासाठी वर्गशिक्षक श्री धोंडी वरक यांचे मार्गदर्शन मिळाले.

तसेच इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गशिक्षिका ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर यानी खूप मेहनत घेऊन मुलांना मार्गदर्शन केले. तर संस्थेचे अध्यक्ष श्रीशैलेश पई, सचिव श्री. प्रसाद नार्वेकर व सर्व पदाधिकारी, पालक, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर सर यांचे प्रोत्साहन मिळाले.


Spread the love

Related posts

फ्रेंड्स ऑफ नेचर तर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आले फुलपाखरू विषयी माहिती 

news

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एस्. एम्. हायस्कूल, कणकवलीची कु. डेलिशा सावंत प्रथम.

news

तर ग्रामीण भागातील शाळा कायमस्वरूपी बंद पडतील..! माजी सभापती उदय परब

news

Leave a Comment