स्टोरी

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याविना दुरावस्था.

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे कित्येक वर्षानुवर्षे झिरंग ७ नंबर शाळा येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच तेथील ग्रामस्थांना व वृद्धांना व महिलांना सावंतवाडी शहरात व बाजारात येण्यासाठी छोट्याशा वीज खांबाच्या पुलावरून येण्यासाठी तारेची कसरत करून यावे लागते. यासाठी कुठलेही सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे स्थानिक नेते यांनाही सर्व माहीत असूनही आजपर्यंत या गोष्टीकडे कानाडोळा केला असून, येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

 

पावसाळ्यात सुद्धा तीन सिमेंटच्या खांबावरून नागरिकांना सावंतवाडीत ये-जा करावे लागते ही अतिशय दुर्दैवजनक असून त्यासाठी कुठल्याही सर्व पक्षीय नेते मंडळींनी ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते त्यांनी मार्ग आरक्षित करून ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा त्याचप्रमाणे त्या नाल्या वरती तीन सिमेंटचे पोल असल्याने आज एक पोल मोडकळीस आला असून विद्यार्थी व वृद्ध महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून शहरात बाजारात येण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जवळचा मार्ग असल्याने हा प्रश्न मार्गी लावावा. तसेच त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ती वाट घसरतीची झाली आहे व तेथे आधारासाठी काहीच उपलब्ध नसल्याने नाल्याच्या पाण्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी तेथे आधारासाठी रेलिंग असणे आवश्यक आहे.

 

यासाठी भाजप नेते तसेच सिंधुदुर्ग बँकेचे संचालक महेश सारंग, महाराष्ट्राचे युवा भाजपचे उपाध्यक्ष विशाल परब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे परब, जिल्हा परिषद चे माजी सदस्य मायकल डिसूजा यांनी व तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी लवकरात लवकर तात्पुरती असलेल्या पुलाची डागडुजी करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असे आवाहन  येथील ग्रामस्थांनी केले आहे.


Spread the love

Related posts

देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ

news

अभिजित व महेश सावंत यांच्या कडून प्रयोगशाळेस साहित्य भेट!

news

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

news

Leave a Comment