स्टोरी

साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर शहरात डास प्रतिबंधक फवारणी करा…! मनसे शिष्टमंडळाची प्रशासनाकडे मागणी

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी शहरात डासांचा प्रचंड फैलाव झाला असून या मुळे पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी पालिका प्रशासनाने या वर तात्काळ उपाययोजना करावी ,शहरात डास प्रतिबंधक फवारणी करावी, उघडी गटारे बंदिस्त करावी या व इतर मागण्यांबाबत आज मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांच्या नेत्रुत्वाखाली ,ऊपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ ,तालुका अध्यक्ष. मिलिंद सावंत ,शहर उपाध्यक्ष. सिद्देश आकेरकर ,मळगाव ऊपविभाग अध्यक्ष राकेश परब यांनी सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाची भेट घेतली. दरम्यान या वर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असून डास प्रतिबंधक फवारणी संपूर्ण शहरात प्रभागनिहाय हाती घेण्यात आली असून आवश्यकत्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले आहे.


Spread the love

Related posts

देऊळवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केले रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री.

news

रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन!

news

संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम!

news

Leave a Comment