स्टोरी

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन

Spread the love

पुणे: मराठी विश्वातील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी लोककलावंत म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१६ पासून २०१६ साली त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. नृत्य सादर करत असताना त्यांना त्रास झाला होता. १९७३ साली त्यांनी मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. लावणी व्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. १९७७ साली दिल्लीमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून नृत्य सादर केले. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेकदा आई आणि सासूची भूमिका साकारली आहे. ‘सतीची पुण्याई’, ‘एक होता विदुषक’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ ‘झपाटलेला’ यांसारख्या सिनेमात काम केलं. केवळ तमाशा अन् चित्रपट नाही तर, त्यांनी नाटकातही काम केलं. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत ‘विच्छा माझी पूरी करा’ आणि ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’ या नाटकात काम केलं होतं.


Spread the love

Related posts

घरची वाट चुकलेल्या ५७ वर्षीय वृद्ध महिलेला सामाजिक बांधिलकीची मदत

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा पंधरावडा निमित्त विविध स्पर्धा संपन्न.

news

आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरीता राज्य शासनाकडून टास्क फोर्सची स्थापना…!

news

Leave a Comment