सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने सोमवार १२ ते बुधवार १४ ऑक्टोबर रोजी कै. राजन म्हापसेकर जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १५ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोमवारी १२ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने सायंकाळी ६ वाजता ब्राह्मण देव प्रासादीक भजन मंडळ माजगाव चिपटेवाडी ( बुवा मनीष गावडे), सायंकाळी ७ श्री जैन महालक्ष्मी प्रासादीक भजन मंडळ वालावल ( बुवा भूषण घाडी ), रात्री ८ वाजता श्री मोरेश्वर प्रासादीक भजन मंडळ नेरूर ( बुवा भार्गव गावडे), रात्री ९:४० वाजता श्री साई खोडदेश्वर प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी ( बुवा गौरव धुरी ), रात्री १०:४० वाजता श्री देव हेळेकर प्रासादीक भजन मंडळ पेडवे ( बुवा संतोष सावंत ) *मंगळवारी १३ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने* सायंकाळी ६ वाजता श्री देव इसवटी पंचदेवी प्रासादीक भजन मंडळ न्हावेली ( बुवा सुरज पार्सेकर ), सायंकाळी ७ वाजता श्री देव गोठण प्रासादीक भजन मंडळ वजराट ( बुवा सोमेश वेंगुर्लेकर), रात्री ८ वाजता श्री सिद्धिविनायक प्रासादीक भजन मंडळ माजगाव ( बुवा वैभव माडखोलकर ), रात्री ९:४० वाजता श्री देव इसोटी प्रासादीक भजन मंडळ मातोंड ( बुवा सचिन सावंत), रात्री १०:४० वाजता श्री दत्त प्रासादीक भजन मंडळ वर्दे ( बुवा नरेंद्र मेस्त्री),बुधवारी १४ ऑक्टोंबर रोजी होणारी भजने सायंकाळी ६ वाजता श्री देव रायकर प्रासादीक भजन मंडळ चराटे ( बुवा सर्वेश मेस्त्री ), सायंकाळी ७ वाजता श्री गुरुकृपा भजन मंडळ न्हावेली ( बुवा रोहित निर्गुण), रात्री ८ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादीक भजन मंडळ पावशी ( बुवा सौ प्रियांका तवटे ), रात्री ९:४० वाजता श्री देव सिद्धेश्वर प्रासादीक भजन मंडळ कोंडुरे ( बुवा विवेक पेडणेकर), रात्री १०:४० वाजता श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ घोडगे ( बुवा हर्षद ढवळ), या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००० रुपये, द्वितीय ७००० रूपये (दोन्ही बक्षिसे वैभव म्हापसेकर पुरस्कृत), तृतीय ५००० रूपये, (सुधीर पराडकर पुरस्कृत) उत्तेजनार्थ ३५०० रूपये,( वैभव म्हापसेकर पुरस्कृत) स्पर्धेतील उकृष्ट गायक २००० रूपये, तर पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादक यांच्यासाठी प्रत्येकी १५०० रुपयाचे पारीतोषिक विशाल वाडकर, बाबल नेमळेकर, आनंद पुनाळेकर, एकनाथ चव्हाण पुरस्कृत तर चषक उदय अळवणी पुरस्कृत देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बाबु इन्सुलकर मेस्त्री ९८२३२२०८६८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने शैलेश गौंडळकर आणि मयुर सुभेदार यांनी केले आहे.
previous post
