शिक्षण

बांधावरच्या शाळेने आनंददायी शनिवार साजरा…! जि. प. शाळा माईण नंबर १ चा उपक्रम.

Spread the love

सिंधुदुर्ग: विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात शिक्षण मिळावे म्हणून राज्यशासनाने आठवड्याचा शनिवार आनंददायी शनिवार म्हणून साजरा करण्यात बाबत कळविले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्रीम. प्रतिक्षा तावडे यांनी दिनांक १३  जुलै २०२४ शनिवार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ मध्ये बांधावरची शाळा तथा बळीराजासाठी एक दिवस या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या उपक्रमाने साजरा केला. या उपक्रमातून शेतीविषयक विविध पैलूंची ओळख करुन देण्यात आली. यामध्ये उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा तावडे यांनी प्रथम शेतीशी संबंधित ७५ औजारांची त्यांच्या उपयोगासह ओळख करुन दिली.- त्यानंतर “गुडघा गुडघा चिखलात पाय रोविले, हो पाय रोविले हे कृतिगीत घेऊन विद्यार्थ्यांना शेतीच्या कामासाठी तयार करण्यात आले. नंतर सौ. अंजली बिर्जे यांच्या शेतात प्रत्यक्ष नेऊन बळीराजाला त्याच्या शेतात भरघोस पिक येऊदे असे शुभेच्छापत्र देण्यात आले.त्यानंतर शेतकर्‍यांची मुलाखत घेऊन तरवा काढणे, पेंढी बांधणे, मेर खापावणे, बांध लावणे, लावणी करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान टँक्टर ची प्रत्यक्ष ओळख करुन देऊन त्याचे विविध भाग समजावून देण्यात आले. औत आणि टँक्टर याचे फायदेतोटे समजावून देण्यात आले. त्यानंतर सौ. अंजली बिर्जे यांनी मुलांना रवा लाडू वाटप करुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. असा हा आनंददायी प्रत्येक शनिवार विद्यार्थ्यांना खूपच आवडेल हे नक्कीच. या उपक्रमाच्या प्रात्यक्षिकात सहकारी शिक्षिका राधिका सावंत, ऋजुता चव्हाण, सृष्टी सवादे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमासाठी पालक सुधीर आडेलकर, दशरथ बिर्जे, अंजली बिर्जे, गांवकर, दर्शना बिर्जे सौ. गांवकर यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिवीका हरमलकर शिष्यवृत्तीची मानकरी

news

महाराष्ट्र पुणे बोर्डाच्या दहावी-बारावीचे निकाल १० जूनपर्यंत लागणार?

news

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश.

news

Leave a Comment