स्टोरी

सिंधुदुर्गची नवी कविता’ काव्यग्रंथात कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: सिंधुदुर्गातील नव्या कवीना मंच उपलब्ध करून देऊन त्यांची काव्य गुणवत्ता महाराष्ट्रातील चांगल्या वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठान या चळवळीच्या माध्यमातून ‘सिंधुदुर्गची नवी कविता’ हा ग्रंथ संपादित करण्यात आला. समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी संपादन केलेल्या या काव्यग्रंथात परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तथा नवोदित कवी किशोर कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गची नवी कविता’ हा काव्यग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक-जोशी,संदीप कदम आणि सत्यवान साटम, यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे. कवी किशोर कदम हे कलमठ गावचे सुपुत्र. यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा गावचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. कवी किशोर कदम यांचे कलमठ चे सरपंच संदीप मेस्त्री, ओसरगावचे सरपंच सुप्रीया कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, पदवीधर शिक्षक शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमीता तांबे यांनी अभिनंदन केले.


Spread the love

Related posts

रविवार दि. २६ फेब्रुवारी होणार कोकण विभागीय ग्रंथालय संघाचे २४ वे वार्षिक अधिवेशन.

news

काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

news

चार वर्षानंतर सावंतवाडी मध्ये रंगणार सुंदरवाडी मिनी महोत्सव…!

news

Leave a Comment