स्टोरी

असनिये गावातील देवळापर्यंत जाणारी बस सेवा तात्काळ सुरू करा…! माजी नगराध्यक्ष बबन सागावकर

Spread the love

सावंतवाडी: निसर्गरम्य अशी ओळख असलेल्या असनिये गावात गेले आठ दिवस अर्धवट बस सेवा सुरू आहे. गावामध्ये देवळापर्यंत जाणारी बस रस्ता खराब असल्याचे कारण सांगून गेले आठ दिवस चार किलोमीटर अलिकडे लावली जाते. त्यामुळे शाळा व कॉलेजमध्ये जाणारी मुलं तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत कारण बस पर्यंत जाण्यासाठी त्यांना नेहमी चार किलोमीटर चार पायी चालावं लागत आहे. गावातील ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या निवेदनाची सतत हाल होत असलेले पाहून ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेतली. त्यावेळी सागर यांनी तात्काळ ग्रामस्थांना घेऊन एसटी व्यवस्थापकांना भेट दिली.ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे सतत होणारे हाल त्यांना निर्देशनात आणून देऊन उद्या पासून काही करून बस सुरू झाली पाहिजे नाहीतर आंदोलन करण्यात येईल. उद्यापासून गावापर्यंत बस सेवा चालू करतो अशी ग्वाही एसटी बस व्यवस्थापकाने दिली. त्याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, राजा शिवाजी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर व राकेश सावंत उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मुणगे कारीवणेवाडी शाळेत वह्या आणि छत्री वाटप कार्यक्रम!

news

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी २२ जुलै पासून प्राथमिक शिक्षक भारतीचे बेमुदत धरणे आंदोलन…! संतोष पाताडे  

news

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

news

Leave a Comment