स्टोरी

आंबोली घाटात अस्वछता करणाऱ्यांना दंड, वनविभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू…!

Spread the love

सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावणे या उद्देशाने वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा पथदर्शी निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-१००० रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-१००० रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-१००० रु. दंड, धूम्रपान करणे-५०० रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.

या अंतर्गत दिनांक-१६  व १७ जून या दोन दिवसात १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व ११,५०० चा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- २ व्यक्ती,धूम्रपान करणारे – 3 व्यक्ती, मद्यपान करणारे-२  व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- ६ व्यक्ती आशा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे.


Spread the love

Related posts

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा!

news

अखेर असनिये गावांमध्ये बस सेवा सुरू…! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे ग्रामस्थांनी मानले आभार.

news

भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !

news

Leave a Comment