स्टोरी

इको सेन्सिटिव्ह भागातील वृक्ष तोड विरोधात माजी आमदार परशुराम उपरकर आक्रमक.

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथे बेकायदा अनधिकृत मायनिंग उतखनन करताना इको सेन्सिटिव्ह झोन मधील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच कणकवली तालुक्यातील वरवडे पिसेकामते या इको सेन्सिटिव्ह भागात सुद्धा रस्ता काम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली असून त्यांचा सर्व्हे करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी मंगळवारी वनविभागाचे उपवंनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्याकडे माजी आमदार परशुराम ऊर्फ जी जी उपरकर यांनी केली.

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंगळवारी सावंतवाडी येथे वनवीभागाचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, मंदार नाईक, विजय जांभळे, प्रवीण गवस, नंदू परब, मनोज कांबळी, संदेश सावंत, स्वप्निल जाधव, गिर्गोल दिया व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपरकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव येथील इको सेन्सिटिव्ह झोन मंध्ये बड्या अधीकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे बेकायदा मायनिंग उतखनन झाले आहे. त्यावेळी या क्षेत्रातील हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. याबाबत गुगल मॅप वरून वृक्ष तोड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे दोषीवर कडक करावाई केली जावी. कणकवली वरवडे पिसेकामते येथे देखील इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात रस्त्याच्या कामावेळी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली आहे मात्र वनपाल भीरवंडे यांनी पंचनामे करताना कमी झाडांची नोंद दाखवली आहे. शिवाय जी झाडे जप्त केलीत त्यांना सील देखील मारलेले नाही याबाबतची वस्तूस्थिती देखील गुगल मॅप वरून उपरकर यांनी उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिली यातील दोषीवर देखील कारवाई केली जावी अशी मागणी जी जी उपरकर यांनी केली. त्याचप्रमाणे गवा रेडे, हत्ती वन्यप्राणी यांच्याबाबत उपाययोजना करण्यासाठी केंद्राने ३५ लाख रुपयांचा निधी खर्च केला मात्र कोणत्याही ठोस उपायोजना झाल्या नाहीत. उलट वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत असे उपरकर यांनी सांगत राज्य शासनाने वन्य प्राणी यांच्या बंदोबस्त साठी कोट्यावधी रुपये दिले त्याचा खर्चाचा तपाशील उपलब्ध नसून तो वनवीभागाने दयावा अशी मागणी केली. सावंतवाडी तालुक्यात गोवा कर्नाटक राज्यातील शिकारी स्थानीक जगल मंध्ये येऊन शिकार करतं आहेत त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नाही याबाबत एक महिन्याच्यां आत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार जिजीं उपरकर व उपस्थितांनी दिला.


Spread the love

Related posts

ऑनलाईन खेळामुळे एका मुलाने गमावले मानसिक संतुलन!

news

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

news

शिक्षक परिषदेची कोकण विभाग नवीन कार्यकारिणी घोषित!

news

Leave a Comment