स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने २०२४-२५ या सालातील आदर्श ग्रंथालय पुरस्कार जाहीर.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रंथालय व आदर्श ग्रंथालय कर्मचारी, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता असे पुरस्कार देण्यात येतात.सन २०२४-२५ या सालातील आदर्श ग्रंथालय पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दानोली व कुडाळ येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय गोवेरी तर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार विभाग स्तरीयत पुरस्कार प्राप्त जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनंत आप्पाजी वैद्य कुडाळ व नेमळे येथील ग्रंथालय चे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ ग्रंथालय कर्मचारी तर ग्रंथालय कर्मचारी सेवक पुरस्कार वेंगुर्ले येथील नगर वाचनालय वेंगुर्ल्याचे कर्मचारी किशोर भगवान सावंत व कळणे येथील ग्रंथालयाचे कर्मचारी श्रीमती सुनिता भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार साठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची बैठक आज २५ डिसेंबरला जिल्हा ग्रंथालय संघामध्ये घेण्यात आली. यावेळी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सचिव राजन पांचाळ, सहसचिव महेश बोवलेकर, संचालक एडवोकेट संतोष सावंत यांच्या उपस्थित पुरस्कार जाहीर करण्यात आले.

आत्माराम राऊळ
आनंद वैद्य
किशोर सावंत
सुनिता भिसे

या पुरस्काराचे वितरण माणगाव येथे होणाऱ्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनामध्ये २९ डिसेंबरला सकाळी दहा वाजता माणगाव वाचनालय येथे होणार आहे. ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता आधी पुरस्कार प्राप्त व सर्व ग्रंथालय कर्मचारी संचालक उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो: आनंद वैद्य यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के बाजूला एडवोकेट संतोष सावंत, राजन पांचाळ, महेश बोवलेकर व श्री गावडे


Spread the love

Related posts

मसुरे केंद्र शाळा येथे आजी आजोबा रमलेत अनोख्या विश्वात…

news

देशातील कारागृहांमधील ७७ टक्के बंदीवानांवरील खटले प्रलंबित!

news

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर.!

news

Leave a Comment