राजकारण

भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.

Spread the love

सिंधुदुर्ग: दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपमांचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी व पदाधीकाऱ्यानी श्रावण येथे सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांना दोन वर्षे पूर्ण झाली तरी देखील भाजपकडून सभामंडप पूर्ण झाला नाही. भाजपला आश्वासनांचा विसर पडला. या कार्यकत्यांनी भाजप नेत्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा देखील केला मात्र त्यांना टाळण्यात आले.

निवडणूक आली कि फसवी आश्वासने देऊन इतर पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम भाजप मधून होत आहे. अनेक गावात अशीच आश्वासने निवडणुकीमध्ये देण्यात आली आहेत. मात्र या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. भाजपची हि फसवेगिरी श्रावण येथील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या समोर कैफियत मांडून दिलगिरी व्यक्त केली व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी दुलाजी परब, स्वप्नील दळवी, अभिजित पवार, ओंकार लाड आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट….

news

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

news

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्‍य! शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

news

Leave a Comment