राजकारण

शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात.

Spread the love

५ एप्रिल वार्ता: लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू असतानाच काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी गोटामध्ये प्रचंड घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून तिढा आहे. तर, महायुतीमध्ये अधिकच गोंधळाची परिस्थिती आहे. नाशिक, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण अशा अनेक जागांवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. तर, काही जागांवर भाजपाच्या तीव्र विरोधामुळे शिंदे गटाच्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले गेले आहे. दरम्यान हिंगोलीतील उमेदवार मागे घेण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली आहे. महायुतीमधील या गोंधळावर वडेट्टीवर यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. खासदारांना तिकिटासाठी इतके झगडावे लागत असेल तर विधानसभा निवडणुकीला काय होईल, या कल्पनेने शिंदे समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे यांचे निम्मे आमदार हे ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची आमची माहिती आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.


Spread the love

Related posts

सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांची मंत्री केसरकर यांच्यावर टिका.

news

शिवसेनेच्या महाराष्ट्र घडविण्याच्या वारीत सामील व्हा..! किरण सोनावणे.

news

विरोधीपक्षांच्यावतीने शेतकऱ्यांना मदतीची मागणी करणार! विरोधी पक्ष नेते अजित पवार

news

Leave a Comment