स्टोरी

कु. स्वानंदी गावकर या विद्यार्थिनीला सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात.

Spread the love


सावंतवाडी: कुमारी स्वानंदी दशरथ गावकर वय वर्ष १६ ही भटवाडी येथे आपल्या परिवारासोबत भाड्याच्या घरामध्ये राहत असून वि. स खांडेकर विद्यालयामध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे. ती हुशार विद्यार्थिनी आहे परंतु सध्या ती स्वादुपिंड्याच्या आजाराने त्रस्त झालेली आहे तिच्या उपचारासाठी जवळपास दोन लाख इतका खर्च आहे तिचे वडील मोल मजुरी करतात. मुलीचे आजारपण व घरचा खर्च भागवणे त्यांना कठीण होत आहे. वि. स खांडेकर शाळेच्या शिक्षकांनी देखील तिच्या उपचारासाठी हातभार लावलेला त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेऊन सदर मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत केलेली आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आव्हान करत आहोत. याप्रसंगी  सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, शरद पेडणेकर, शामराव हळदणकर, अशोक पेडणेकर, रवी जाधव व वि. स खांडेकर शाळेची धुमाळे सर उपस्थित होते. सदर मुलीचा जॉईंट अकाउंट नंबर खालील प्रमाणे आहे. स्वानंदी दशरथ गावकर सिद्धी दशरथ गावकर Ac/3992996509 lFSC CBIN 0283536 सेंट्रल बँक ऑफ इंडिया सावंतवाडी मो. नंबर 8055728695


Spread the love

Related posts

ऑन कॉल रक्तदाते संस्थेद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवानिमित्त लाल किल्‍ल्‍याभोवती अभेद्य सुरक्षाकवच!

news

ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

news

Leave a Comment