स्टोरी

कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे ज्येष्ठ कवी दादा मडकईकरांचा स्नेह सत्कार..!

Spread the love

सावंतवाडी:  सुप्रसिद्घ मालवणी ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शुक्रवारी स्नेह सत्कार करण्यात आला. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव सावंतवाडीत सुरू आहे.

या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेतर्फे स्नेह सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. अरुण पणदूरकर, भरत गावडे, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस, सुधीर धुमे, वैभव केंकरे, तसेच सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, तातोबा गवस, पी. टी. परब, कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, श्यामसुंदर सावंत, चंद्रशेखर जोशी, सावंतवाडी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, व्हा. चेअरमन संजू शिरोडकर, दीपक राऊळ आदी उपस्थित होते. दादा मडकईकर यांचा परिचय राजू तावडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कात्रे यांनी केले.


Spread the love

Related posts

इन्सुली रमाईनगर येथे शिवजयंती उत्सवासाठी समाज मंदिरची चावी देण्यासाठी ग्रामपंचायतची टाळाटाळ..! ग्रामस्थ आक्रमक. 

news

कुख्यात गुंड अतिक अहमद दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त!

news

पनवेलकर कुटुंबियांची वारकरी दिंडी विविध उपक्रमांनी संपन्न…!

news

Leave a Comment