स्टोरी

सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण? “Mngl” कंपनी कि सावंतवाडी नगरपरिषदचे अधिकारी?

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात सध्या गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरू आहे. पावसाळा जवळ येत असल्यामुळे हे गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित काम हे महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड केंद्र सरकारच्या (Mngl – Maharashtra Natural Gas Limited – centra govt. Company) कंपनीचे आहे. हे काम सावंतवाडी शहरात सुरू असताना सहाजिकच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि काम सुरू असताना दुरावस्था होणे हे साहजिकच आहे. रस्त्यावर झालेली धूळ रस्त्याची झालेली दुरावस्था सर्वसामान्य नागरिकांना दिसत आहे. पण त्या मागचं योग्य कारण सहसा लोकांना माहित नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेसाठी सावंतवाडीतील काही संतप्त नागरिक हे फक्त आणि फक्त ठेकेदाराला जबाबदार ठरवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड केंद्र सरकारच्या (Mngl – Maharashtra Natural Gas Limited – centra govt. Company) कंपनीचे ठेकेदार सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईनचे काम करत आहेत. त्या ठेकेदारांचं काम साहजिकच रस्ता खोदाई करून पाईपलाईन घालणं आहे. आणि पाईपलाईन घातल्यानंतर रस्त्याची जी काही नुकसान होत आहे, तोडफोड होत आहे ती तोडफोड किंवा आणि रस्ता दुरुस्त करण्याचं काम सावंतवाडीतील नगरपरिषदेला दिलेलं आहे. अर्थात त्याबाबत टेंडर नगरपालिकेने भरलेला आहे आणि नगरपालिकेकडे तसे योग्य ते कागदपत्र करून पैसेही भरण्यात आलेले आहेत. मात्र नगरपालिकेचे अधिकारी योग्य ते पाऊल उचलत नाहीत आणि तत्काळ काम सुरू करत नाहीत. अर्थात रस्त्याचे दुरुस्तीच काम नगरपालिकेकडे दिलेले असून या कामासंबंधित नगरपरिषदेचे जे कोणी अधिकारी आहेत ते निवांत बसलेले आहेत. असं दिसून येत आहे. कारण साहजिकच जर नगरपरिषदेला या रस्त्याच्या दुरुस्तीचे पैसे भरलेले आहेत, तर नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याने या कामाची सुरुवात तात्काळ केली पाहिजे होती. जेणेकरून सावंतवाडीतील नागरिकांना याचा त्रास होणार नव्हता. मात्र नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी आतापर्यंत निवांत बसल्यामुळे हा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. असं दिसून येत आहे आणि याचा नाहक त्रास महाराष्ट्र नॅच्युरल गॅस लिमिटेड केंद्र सरकारच्या ठेकेदाराला सहन करावा लागत आहे.

एकंदरीत विचार केला तर सावंतवाडी नगरपालिकेत रस्ता दुरुस्तीसाठी पैसे भरलेले आहेत. त्याचे टेंडर नेमकं कोणाला द्यावं? हे काम कोणाला मिळावं? यासाठी कदाचित मोठी शर्यत सुरू असेल आणि त्यामुळे अजून पर्यंत काम कोणत्या ठेकेदाराला दिलेलं नसेल. असा संशय आहे. त्यामुळे साहजिकच रस्त्या दुरुस्तीच्या कामाला उशीर होत असेल तर संबंधित Mngl चे ठेकेदार या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार नसून रस्त्याच्या दुरावस्थेला आणि सावंतवाडीतील नागरिकांना होणाऱ्या त्रासाला मुख्य जबाबदार सावंतवाडी नगरपरिषदेतील या कामाचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. हे नाकारता येणार नाही. आणि हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे.


Spread the love

Related posts

आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी…!

news

वाफोली गावात काजू बागेला आग लागून मोठ्या शेताकऱ्यांची प्रमाणात नुकसान

news

डॉ. मधुरा सुर्वे ‘एमएच उमन एक्सलेंस २०२६’ पुरस्काराने सन्मानित.

प्रसाद परब

Leave a Comment