स्टोरी

शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ च्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ आयोजीत दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे औचीत्य साधुन कोल्हापुर येथील ” अमरक्रांती कला पथक “यांचा ” पोवाडा ” सादर करण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणारा शिवजयंती उत्सव हा शिवमय व्हावा या उद्देशाने स. ९:०० वा •महाराजांच्या मुर्तिचे पुजन, स. ९: ३० वा•दर्शन व तिर्थप्रसाद,स. १०: ०० वा: “अमरक्रांती कलापथक “कोल्हापुर यांचे (पोवाडा ) सादरी करण,दु. १२: ३० वा. महाराजांची आरती, दु.  १: ०० वा•महाप्रसाद, दु. ३:०० वा. ह.भ.प. श्री. संदेश गोसावी यांची किर्तन सेवा “पावन खिंडीचा रणसंग्राम ” सांय. ५ :०० वा. भजन सेवा शिवस्वराज्य मित्रमंडळ ,सांय. ६ : ०० वा. उत्तर पुजा व समारोप इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भावीकांनी व शिवभक्तांनी तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

ओवळीयेचा सुपुत्र राहुल सावंत यांची नायब सुभेदार पदी बढती

news

गोवा क्षत्रिय मराठा समाज महिला विभाग मुरगांव शाखाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन..!

news

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याचा हल्ला.

news

Leave a Comment