क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून इंग्लंडच्या तरुणीने केली रेडी येथील तरुणाची फसवणूक…!

Spread the love

सुमारे ५ लाख रुपयांची फसवणूक.

 

वेंगुर्ले प्रतिनिधी: तालुक्यातील रेडी बोंबडोजीचीवाडी येथील असलेले रहिवासी आणि कोकण रेल्वे असिस्टंट लोको पायलट ज्ञानेश्वर कांता केरकर, शिक्षण बी.ई. इलेक्ट्रिकल या तरुणाला इंग्लंड येथील तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल रुपये ५ लाख ४० हजार २२३ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी केरकर याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आज भादवी कलम ४२०, आय टी अॅक्ट कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान नागरिकांनी फसवणुकी पासून सावध राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.रेडी येथील ज्ञानेश्वर कांता केरकर या तरुणाची मूळ गुजरात येथील असलेल्या आणि सद्या इंग्लंड येथे राहणाऱ्या कु.ड्रीटी आकाश या तरुणी बरोबर मराठी मेट्रोमनी. कॉम या वेबसाईट द्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.इंग्लंड येथील ड्रीटी आकाश या तरुणीने आपण लग्नाआधी आपली इंग्लंड येथील संपत्ती विकते आणि भारतात रेडी येथे येते असे सांगितले.आपल्या इंग्लंड येथील संपत्तीची रक्कम सुमारे दोन कोटी रुपये आहे.तेथील चलन आणि भारतातील चलन वेगळे असल्याने हि सर्व प्रक्रिया करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे.तू तेवढी रक्कम माझ्या बँक अकाउंट मध्ये टाक.त्यानंतर माझी सर्व दोन कोटी रक्कम तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते आणि तिथे मी येते आल्यावर आपण लग्न करू असे ड्रीटी आकाश हिने ज्ञानेश्वर केरकर याला सांगितले.तिने लग्नाचे आमिष दाखविल्याने तिच्या म्हणण्यानुसार केरकर याने टप्याटप्याने तिच्या अकाउंटमध्ये रुपये ५ लाख ४० हजार २२३ रुपये पाठवले. दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी ते ८ डिसेंबर २०२३ या मुदतीत हा फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केरकर यांने दिलेल्या तक्रारीवरून वेंगुर्ले पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अदिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरात SPK कॉलेजच्या आसपास ड्रग्ज आणि गांजा विक्री? पोलीस प्रशासनाचा दुर्लक्ष.

news

पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

news

प्रियकराने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ रहाणार्‍या प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले!

news

Leave a Comment