स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू…!

Spread the love

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.

 

राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी राज्यात सण / उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

जिल्ह्यात वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते असावेळी आंदोलकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, आगामी साजरे होणारे सण / उत्सव निमित्ताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोचर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.

 

या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करणयात येत आहे. कलम 37 (1) नुसार

१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दडे, बंदुका, सुरे, काठ्या किना ताज्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु वाळगणे

२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे

३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोढावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमाक रणे किंवा तयार करणे

४) व्यक्तीची किवा प्रेते किवा आकृती किवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्पाची शक्यता असते.)

५) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किडा वाद्य वाजवीणे,

६) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिस तयार करणे व लोकांत प्रसार करणे कलम 37(3) नुसार

१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणुका काढणे व सभा घेणे.

 

२) हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिदर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेठलेली आहे. अशा व्यक्तीना आणि लान, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकान्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.


Spread the love

Related posts

१९६८ बॅचचे माजी विद्यार्थी रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर..! ;

news

आ. वैभव नाईक यांनी कुटुंबासमवेत साजरी केली दीपावली

news

मसुरे देऊळवाडा शाळेत “ओळख रानभाज्यांची” उपक्रम संपन्न.

news

Leave a Comment