स्टोरी

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने ‘एक दिवा सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

Spread the love

सावंतवाडी: अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाकाठी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिमेवर देशाच्या संरक्षणामध्ये शहीद झालेल्या आणि सध्या देशसेवा बजावत असलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘चला कृतज्ञता व्यक्त करूया, एक दिवा सैनिकांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी शहरातील सर्व नागरीक व समाजसेवी संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

श्रीमती जयवंती वायंगणकर यांचे निधन.

news

अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव.

news

सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ महिला बाल रुग्णालयासाठी २० लाखाचा सी.एस.आर.फंड

news

Leave a Comment