Uncategorized

जून पासून सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक पुन्हा शिक्षकी सेवेत रुजू झाले! परंतु अद्याप मानधन नाही

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक गेल्या जून पासून 20000 रुपये मानधन तत्त्वावर पुन्हा शिक्षकी सेवेत रुजू झाले आहेत. गेले पाच महिने त्यांना मानधनच देण्यात आलेले नाही. जवळपास चार लाख 77 हजार रुपये एवढे मानधन 53 शिक्षकांचे देणे आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कुडाळकर यांनी या 53 शिक्षकांचे मानधन द्या अशा मागणीचे स्मरणपत्र शिक्षण संचालकांना पाठवले आहे. या 53 शिक्षकांनी आम्हाला आता दिवाळी अगोदर तरी मानधन द्या नाहीतर आम्हाला ही सेवा सोडावी लागेल अशी विनंती तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवा मानधनाबाबत चे पत्र शिक्षण संचालकांना पाठवले आहे. तीन नोव्हेंबरला शिक्षण संचालक यांच्याकडे तशी मागणी केली आहे तसे पत्र त्या सेवानिवृत्त शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभाग दाखवत आहे.


Spread the love

Related posts

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात प्रत्युत्तर;

news

कणकवली तालुका वैश्य समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा

प्रसाद परब

प्रा.सुषमा मांजरेकर यांचा मराठी गौरव दिनानिमित्त सत्कार…

news

Leave a Comment