स्टोरी

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू होणार

Spread the love

२५ ऑक्टोबर वार्ता: सद्य:स्थितीत मुंबई ते मडगाव कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातील ३ दिवस चालवली जात आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. कोकण रेल्वेचे उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

१ नोव्हेंबरपासून रेल्वेसाठी उन्हाळी वेळापत्रक लागू होणार. कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या उशाला जरी भल्या मोठ्या टाक्या असल्या तरी पाण्या अभावी कोरड घशाला पडत आहे.

news

मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा ! हिंदु जनजागृती समिती

news

अंशता अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा वितरित मध्ये पटसंख्येची अट शिथिल करा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे साकडे!

news

Leave a Comment