स्टोरी

ओळखपत्र न लावल्‍यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !

Spread the love

११ ऑक्टोबर वार्ता: शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कारवाई करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे. याविषयीचा आदेश ७ मे २०१४ या दिवशी राज्‍यशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे; मात्र अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत. त्‍यामुळे येथे येणार्‍या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखता न आल्‍याने अडचण येते. त्‍यामुळे १० ऑक्‍टोबर या दिवशी शासन आदेश काढून याविषयी कार्यवाही न करणार्‍यांवर कारवाईचा आदेश शासनाने दिला आहे. ओळखपत्र दर्शनी भागात न लावणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांनी नावे सुरक्षा व्‍यवस्‍थेतील पोलिसांनी संबंधित विभागाच्‍या अधिकार्‍यांकडे देण्‍याची सूचना या आदेशात देण्‍यात आली आहे.


Spread the love

Related posts

हडी जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी!

news

कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठक संपन्न!

news

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्य सन्मान विशेष पुरस्कार कुडाळ येथे प्रदान.

news

Leave a Comment