स्टोरी

सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा! सामाजिक बांधिलकीची मागणी

Spread the love

सावंतवाडी: स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक बांधिलकीची वतीने करण्यात आली आहे. सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये मार्च, एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो. परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमताना दिसतो. नगरपालिकेच्या समोरील तलावातील पाणी पूर्णपणे हिरवं गार झालेले आहे. हे दिसायला खराब दिसत आहे. यावर नगरपरिषेदेने लवकरात लवकर उपाय योजना करून तलावातील तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून तलावाच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडेल असं सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचवलं आहे.


Spread the love

Related posts

आधारकार्ड अद्ययावत करतांना सतर्क रहाण्याविषयी यु.आय.डी.ए.आय.ची सूचना

news

सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे..! जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील

news

वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा २० मार्च रोजी!

Leave a Comment