Uncategorized

लग्न झालं तरी माझ्यामुळेच, पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही प्रवृत्ती सोडा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला……

Spread the love

मुंबई : मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.मला मुंबईकरांची क्षमाही मागायची आहे. आम्ही एकाचवेळी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांची क्षमा मागायची आहे. एकावेळी अनेक कामे घेतल्याने प्रदूषण होतंय. ट्रॅफिक जाम होतंय. पण काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे झाली की पुन्हा त्रास होणार नाही. नंतर ३० ते ४० वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.महापालिका बँकेत पैसा गुंतवूण त्यांच्या इंटरेस्टवर जगण्यासाठी निर्माण झाली नाही. तर महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याकरीता असते. म्हणून जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, असे निर्देश दिले. मुंबईतील ज्या समस्या आहेत. त्या दूर कशा करता येईल याचे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत, असंही ते म्हणाले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

news

अंध मुलांच्या सहलीचे सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीकडून स्वागत…

news

वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने वतीने गोवा टूर्सचे आयोजन

news

Leave a Comment