स्टोरी

जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करा !- दीपक केसरकर, पालकमंत्री

Spread the love

कोल्हापूर: जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करावी आणि शहर आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत. शहराशी निगडित विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, प्रशासक तथा आयुक्त डॉ.के. मंजुलक्ष्मी यांसह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

 

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहराचा हद्दवाढ प्रश्न प्रलंबित आहे, थेट पाणीवाहिनी योजना पूर्णत्वास येऊनही अमृत योजनेच्या टाक्या अपूर्ण असल्याने शहरास पाणी मिळत नसल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी नगररचना विभागाची कार्यप्रणाली पालटणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याचसमवेत शहरातील कचरा व्यवस्थापन, घंटागाड्यांची दुरुस्ती, ‘आपला दवाखाना’ अंतर्गत शहरातील सर्व रुग्णालये चालू करावीत, अशा सूचना केल्या.


Spread the love

Related posts

राज्यातील २४ लाख ६० सहस्र विद्यार्थी बनावट! ६० सहस्र शिक्षकही ‘अतिरिक्त’ ठरणार? आधारकार्ड पडताळणीत २४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आढळले अवैध!

news

सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन तर्फे रानभाज्या पाककला प्रदर्शन व स्पर्धा चे आयोजन!

news

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी ! श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

news

Leave a Comment