स्टोरी

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नक्कलची (कॉपीची) ३ लाख रुपयांना विक्री !

Spread the love

घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचा संशय!

छत्रपती संभाजीनगर: तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांची टोळी सक्रीय आहे. थेट परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना उत्तरे पुरवली जात असल्याची माहिती समोर आले आहे. तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची नक्कल (कॉपी) ३ लाख रुपयांना विकली जात आहे.

 

चिकलठाणे येथील इऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या सिद्धतेत असलेला राजू नागरे याला पोलिसांनी ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली होती. परीक्षार्थींना उत्तरे पुरवणार्‍या टोळीमध्ये ७ जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने अन्वेषण करत आहेत.१. एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस दुचाकी चोराच्या शोधात होते, तेव्हा परीक्षा केंद्रासमोर ४ तरुण संशयास्पद वावरतांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेजण पळून गेले. राजू केवळ पोलिसांच्या हाती लागला.

 

२. त्याच्या खिशात मास्टरकार्ड, २ भ्रमणभाष संच सापडले. त्यातील टेलिग्रामवर ३४ प्रश्‍नांची छायाचित्रे होती. आरोपी राजू याने सकाळी ९ वाजता परीक्षेत एका उमेदवाराला उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना सापडले.

 

३. परीक्षा केंद्रातून ही यंत्रणा चालत असून एका परीक्षार्थीला उत्तरपत्रिकेची चिठ्ठी देण्यासाठी आतील कर्मचारी ३ लाख रुपये घेत असल्याचे अन्वेषणात सिद्ध झाले आहे. या टोळीची व्याप्ती मोठी आहे. अजून ६ आरोपींची नावे समोर आली आहेत.


Spread the love

Related posts

विज्ञान प्रदर्शनात सतीश मुणगेकर यांचे यश….!

news

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान कर्मचाऱ्यांना दिवाळी स्वामी प्रसाद वाटप!

news

जुनी पेन्शनबाबत महत्वापूर्ण माहिती….केंद्रीय कर्मचारी आणि राज्य

news

Leave a Comment