स्टोरी

केंद्राने घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही! मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण

Spread the love

८ सप्टेंबर वार्ता: केंद्राने घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही असं मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं आहे. पण मराठ्यांना तसं आरक्षण देताना हा हिशोब 50 टक्यांवर चालले आहे. आरक्षण 50 टक्यांवर जात असल्याने घटना दुरुस्ती केल्या शिवाय पर्याय नाही, असा उल्लेख पवार साहेबांनी देखील केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. Ews मध्ये 10 टक्के आरक्षण दिलं, त्याच पद्धतीने ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने सूरु केली आहे. मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत. पण उर्वरित महाराष्ट्राचं काय? असा प्रश्न माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. शिवाय हा विषय देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता आहे. यावर पुन्हा न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं, असं अशोक चव्हाण म्हणाले.

जातिनिहाय जनगणना ही काँगेसची जाहीर मागणी! अशोक चव्हाण….

आरक्षण आणि दुष्काळ हे दोन्ही विषय फार गंभीर आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून हे विषय गांभीर्याने घ्यावेत. डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे .. त्यापूर्वी अधिवेशन बोलावून निर्णय झाले तर योग्य होईल अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली ….

 


Spread the love

Related posts

देवगड तालुक्यातील ग्रामीण कुटा या वित्तीय संस्थेच्या विरोधात जनसामान्यांच्या लढ्याला यश! संतोष मयेकर

news

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव १९ जुलै रोजी!

news

कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांकडून शाळेला सिलिंग फॅन भेट.

प्रसाद परब

Leave a Comment