स्टोरी

भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे….

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: घरात शिवाजी जन्माला यावा, असे म्हटले जाते; परंतु त्यापूर्वी जिजाबाई जन्माला यावी लागते. जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे श्रीराम आणि श्रीकृष्ण कधी अवलंबायचे ? हे कळणारा एकमेव राजा शिवछत्रपती म्हणावे लागतील. ते राजकारण धुरंधर होते. शहाजीराजांनीही मोगलांकडे चाकरी करत असूनही हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. हे सर्व आम्ही विसरलो आहोत. त्यामुळे मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण झाले. शिवछत्रपतींच्या जन्मासाठी मराठी जनतेला ४५० वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतर आजही आपण पुन्हा शिवराय जन्म घेतील, याची वाट पहात आहोत.भारत विश्वगुरु होण्याकरता आपल्याला आपला वैभवशाली जुना इतिहास जाणून घेतला पाहिजे. हिंदु धर्म विराट आहे. त्यामुळेच या धर्मातच अनेक योद्धे, साहित्यिक, दानशूर, स्वातंत्र्यसैनिक यांसह अष्टपैलू व्यक्तीमत्त्व जन्माला आली. मनाची ‘मॅनेजमेंट’ करणारे मनाचे श्लोक समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिले. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आपण विसरलो. उद्याचा भारत घडवायचा असेल, तर संस्कृती जतन केली पाहिजे. भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे, असे प्रतिपादन अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.

 

चतुरंग आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्यााचे पूर्वरंग’ या अंतर्गत ‘भारत – काल, आज आणि उद्या’ याविषयावर ते बोलत होते. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी शरद पोंक्षे यांचा सत्कार केला.


Spread the love

Related posts

गोव्यात ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषद’!

news

इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! ब्रिगेडियर हेमंत महाजन

news

मंदार कृषी तंत्र निकेतन कोळींब(मुरबाड.ठाणे)च्या वतीने “महाराष्ट्र कृषि दिन” विविध उपक्रमांनी साजरा!

news

Leave a Comment