शिक्षण

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून २ वेळा बोर्डाची परीक्षा

Spread the love

२४ ऑगस्ट वार्ता: शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत दहावी आणि बारावीला वर्षाच्या शेवटी बोर्ड परीक्षा देता येत होती. दहावीनंतर दोन आणि नंतर 3 वर्षे अशा शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा बदल होणार आहे. त्यानुसार यापुढं वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे. यामुळे शिक्षणाचा 10 प्लस 2 पॅटर्नही होणार रद्द होईल. 2024 पासून केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण लागू करणार आहे.

शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच अकरावी आणि बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विषय निवडीचे देखील स्वातंत्र्य असणार आहे. या विद्यार्थ्यांन दोन भाषांचा अभ्यास करता येईल. यामध्ये एक भारतीय भाषा असेल. यासाठी नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकेदेखील तयार केली जात आहे. सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश सर्व महाराष्ट्र, दिल्ली,सीबीएसईसह सर्वच बोर्डांना देण्यात आले आहेत. एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर 75 टक्के आणि लेखी परीक्षेवर 25 टक्के भर दिला जाणार आहे. तसेच विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असेल. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला 20 ते 25 टक्के महत्त्व असायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हायला मदत होणार आहे.


Spread the love

Related posts

महसूल विभाग तलाठी पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर

news

सर्व शाळांमध्ये मराठी भाषाविषय सक्तीचा करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी

news

शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा

news

Leave a Comment