स्टोरी

दिवंगत वायरमन धनंजय फाले यांच्या कुटुंबीयांना अहिल्याबाई समाज मंडळामार्फत आर्थिक हातभार!

Spread the love

माणगाव प्रतिनिधी:

महादेवाचे केरवडे येथील वायरमन धनंजय भाले यांचा सेवेत असताना लाईटच्या पोलवर शॉक लागून काही दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला होता. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अहिल्याबाई धनगर समाज मंडळ गोठोस धनगरवाडी व गोठोस गावातील काही दानशूर व्यक्तींनी धनंजय याच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपात मदत जमा केली. गोठोस येथील हे अहिल्याबाई धनगर समाज मंडळ विविध समाज उपयोगी उपक्रम घेत असते. या मंडळाचे कार्यकर्ते नैसर्गिक हानी, पर्यावरण, सामाजिक प्रबोधन, कौटुंबिक स्थिरता या विषयावर नेहमीच काम करत असतात. हाच धागा पकडून धनंजयच्या कुटुंबीयांना फुल न फुलाची पाकळी ने मदत होईल या हेतूने ही २०,०००-/  रुपयांची मदत त्यांना सुपूर्त करण्यात आली.


Spread the love

Related posts

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारिंवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली!

news

१८ वे निमंत्रित विभागीय कवयित्री संमेलन उत्साहात संपन्न..!

news

आंबोली घाटात आयशर आणि बसमध्ये अपघात.

news

Leave a Comment