स्टोरी

संजय राऊतांकडून नारायण राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल !

Spread the love

 

 

 

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड कोर्टात गेले आहेत. सेटिंग करून संजय राऊत यांचं नाव मतदान यादीत टाकलं असं नारायण राणे बोलले होते.याच वक्तव्यावरुन नारायण राणेंच्या विरोधात संजय राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

 

संजय राऊत यांनी म्हटलं की, नारायण राणे यांच्या विरोधात मी कोर्टात आलो आहे. १५ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी भांडूप येथील सभेत माझ्या विरोधात भाष्य केलं होतं. संजय राऊतांना मी खासदार बनवलं असं त्यांनी सांगितलं.माझ्याकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती,. माझं मतदार यादीत नाव नाही हे असं कसं बोलतात. त्यांनी सेटिंग करून माझं नाव मतदान यादीत टाकलं असं बोलत आहेत. मी कोर्टात माझा जबाब दिलेला आहे. त्यांनी कोणाशी सेटिंग लावली ते सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं नाही तर त्यांची खासदारकी धोक्यात आहेत. त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. मी मानहानीचा खटला दाखल केला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.


Spread the love

Related posts

मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी पैशांची मागणी करत असल्‍याचा केमिस्‍ट्र अँड ड्रगिस्‍ट संघटनेचा आरोप!

news

सुप्रसिद्ध भजनी बुवा नाट्य कलाकार कै.श्री.दिनेश अनंत वेरलकर यांचे निधन.

news

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या आजाराने पुणे येथे निधन!

news

Leave a Comment