स्टोरी

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित भव्‍य संग्रहालय उभारणार ! सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री.

Spread the love

७ ऑगस्ट वार्ता: महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून साजरे करण्‍यात येत आहे. या निमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनकार्यावर आधारित भव्‍य संग्रहालय उभारण्‍यात येईल, असे प्रतिपादन राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नर्‍हे येथील शिवसृष्‍टीला भेट दिल्‍यानंतर ते बोलत होते. ‘शिवराज्‍याभिषेकाच्‍या ३५० व्‍या वर्षाच्‍या निमित्ताने प्रत्‍येकाच्‍या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्‍हावेत आणि त्‍यांच्‍या विचारांवर आधारित कृती करण्‍याची ऊर्जा नागरिकांना मिळावी, यासाठी हे आयोजन आहे’, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, शिवसंग्रहालय भव्‍य दिव्‍य आणि अत्‍याधुनिक संकल्‍पनेवर आधारित व्‍हावे, त्‍यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे, अशा सूचना विभागाला देण्‍यात आल्‍या आहेत.मुंबईत येणार्‍या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य या निमित्ताने पोचेल. महाराजांच्‍या जीवनाशी निगडित ८८ सहस्र वस्‍तू राज्‍यात विविध ठिकाणी आहेत, त्‍या एकाच ठिकाणी आणण्‍याचाही प्रयत्न संग्रहालयाच्‍या निमित्ताने होणार आहे.सार्वजनिक उद़्‍घोषणा यंत्रणेच्‍या (पी.ए.एस्.) माध्‍यमातून प्रतिदिन सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित दिनविशेष आणि त्‍यांचे विचार प्रसारित करण्‍यात येणार आहेत.शिवरायांच्‍या इतिहासाशी संबंधित १२ टपाल तिकिटे प्रकाशित करण्‍यात येणार आहेत. येत्‍या ९ ऑगस्‍टला शहाजी महाराजांवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यात येईल. रिझर्व्‍ह बँकेच्‍या माध्‍यमातून सोने, चांदी आणि तांबे यांची ‘होन’ मुद्रा सिद्ध करण्‍यात येईल. छत्रपतींची वाघनखे देण्‍याची विनंती ब्रिटिश म्‍युझिअमने मान्‍य केली आहे, जगदंबा तलवारही परत आणण्‍याचे प्रयत्न चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्‍सवाचेही आयोजन करण्‍यात येईल.


Spread the love

Related posts

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन..!

प्रसाद परब

सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच- फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा मंगळवार ता .९ एप्रिल रोजी.

news

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरवर बसवलेल्या ChaSTE पेलोडचा प्रारंभिक डेटा उपलब्ध!

news

Leave a Comment