स्टोरी

छत्रपती संभाजीनगर येथे ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेमुळे खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रम सोडून गेले !

Spread the love

छत्रपती संभाजीनगर: येथील छत्रपती संभाजीनगर रेल्‍वेस्‍थानकावर ६ ऑगस्‍ट या दिवशी ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुनर्विकास कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्‍तियाज जलील उपस्‍थित होते. कार्यक्रमावेळी भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्‍या. त्‍यानंतर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण चालू होण्‍यापूर्वीच खासदार इम्‍तियाज जलील कार्यक्रमातून निघून गेले. ‘जय श्रीराम’ घोषणेवर खुलासा करतांना खासदार इम्‍तियाज जलील म्‍हणाले की, मी कशाला ‘जय श्रीराम’च्‍या घोषणेला विरोध करू ? *खासदार इम्‍तियाज जलील यांना पाकिस्‍तानात पाठवा !*भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर म्‍हणाले की, विकासाच्‍या पर्वाहात चांगली दृष्‍टी ठेवणे आवश्‍यक असते; पण कोठेतरी निषेध व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. त्‍यामुळे अशा व्‍यक्‍तींना (खासदार इम्‍तियाज जलील) या मंचावर बसवायला नको होते. यांची जागा पाकिस्‍तानच्‍याच मंचावर आहे. ‘एम्.आय.एम्.’ची जागा हिंदुस्‍थानच्‍या मंचावर नाही.


Spread the love

Related posts

अमली पदार्थां पासून स्वतःला दूर ठेवा! मालवण पो. नि. प्रवीण कोल्हे यांचे प्रतिपादन

news

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना धर्माभिमानी हिंदूंनी पिटाळले ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिंदूंचे धर्मांतर….

news

पर्यटन विकासासाठी पर्यटन कंपन्यानी भर देऊन दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया..! ललित गांधी

news

Leave a Comment