शिक्षण

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माता काशीबाई महादेव परब मेमोरियल ट्रस्ट ,मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे च्या तीन विद्यार्थ्यांना 2022-23 या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.धृती केशव भोगले (जिल्ह्यात 28 क्रमांक),मानस वासुदेव धारगळकर (जिल्ह्यात 36 वा) ,श्रिया श्रीराम परब (जिल्हात 60 वा क्रमांक).या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,सचिव अशोक मसुरेकर,संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले,मुख्याध्यापक किशोर देऊलकर तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

शाळा बंद झाली की फक्त इमारत बंद होत नाही; गावाचे भविष्य बंद होते.

newss

सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

news

उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे येथील ३४ एनसीसी कॅडेट्स ‘CATC-314’ ओरोस शिबिरात सहभागी.

news

Leave a Comment