स्टोरी

जाईबाई – साईनगर प्रभागात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने नागरी सुविधा कामांचा शुभारंभ!

Spread the love

शाखा प्रमुख सचिन आळंगे यांच्या पाठपुराव्याला यश….

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून जाईबाई – साईनगर प्रभाग क्र ९६ मधील गटारे व पोहच रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. जाईबाई – साईनगर प्रभाग क्र . ९६ चे शाखा प्रमुख सचिन आळंगे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेकडे सातत्याने पाठपूरावा करून प्रभागातील सह्याद्री पार्क व लगतच्या परिसरातील नागरी वस्तीत गटारे व पायवाटा बनविण्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून प्रभागातील सह्याद्री पार्क या नागरी वस्तीतील अनेक वर्षाची पावसाळ्यात निर्माण होणारी चिखल आणि दलदलीची समस्या संपुष्ठात येणार आहे. तसेच सांडपाण्याचा निचरा होणार असल्याने या परिसरातील सांडपाणी वाहून जाण्याची समस्या संपुष्ठात येणार आहे. या कामाचा शुभारंभ शाखा प्रमुख सचिन आळंगे यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. या समयी जनक पाटील उप-शाखाप्रमुख, रोहिदास पगारे, प्रज्वल माने उप-शाखाप्रमुख, विजय आळंगे, तुषार उराडे, महेंद्र कांबळे, पल्लवीताई भगत, उषाताई भगत, शिवाजी बडबुजर, जगदीश जाधव, गायकर दादा, रवी पाटील, दयानंद साळवे आणि त्या ठिकाणचे नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त गावात गावाकऱ्यांच्या उपस्थितीत होळी उत्साहात साजरी…!

news

सावंतवाडीतील ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी !

प्रसाद परब

रस्त्यावर बसून मच्छीची विक्री करणाऱ्या महिलांना सामाजिक बांधिलकीने मिळवून दिली हक्काची जागा.

news

Leave a Comment